Greetings For Ajit Pawar: एका छोट्या चाहत्याकडून उपमुख्यमंत्र्यांना थेट शेताच्या बांधावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा !

विराजचे आई आणि वडील प्राथमिक शिक्षक आहेत. विराज याला भाषणाची आवड असल्याने त्याने त्याच्या स्टाईलमध्ये त्याच्या आवडत्या नेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. त्यांची झटपट निर्णय घेण्याची क्षमता आणि बोलण्याची शैली यामुळे तरुण वर्ग दादांकडे खेचला जात आहे. लहान लहान मुलेसुद्धा त्यांचे जबरदस्त फॅन आहेत. अशाच एका चिमुकल्या चाहत्याने थेट शेताच्या बांधावरून छोटंसं भाषण करून अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अजित पवार यांचा नुकताच 22 जुलै रोजी वाढदिवस झाला. त्यांना राज्यभरातील कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. जवळगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) मधील नऊ वर्षाच्या विराज प्रणित कापसे याने अजित पवार यांना वेगळ्याच स्टाईलने शुभेच्छा दिल्या आहेत.

विराजचे आई आणि वडील प्राथमिक शिक्षक आहेत. विराज याला भाषणाची आवड असल्याने त्याने त्याच्या स्टाईलमध्ये त्याच्या आवडत्या नेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा देताना विराज म्हणतो, “महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचे आधारवड शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानाचा मुजरा. अरे, यंदा तू कसा आमदार बनतो ते बघतोच. असे म्हणायला धाडस लागतं. ते धाडस पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात अजित पवारच लागतात.

दादा सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या विराज कापसेकडून हार्दिक शुभेच्छा. ज्यांच्या नावात तेज आहे ते अजित दादा. बोले तैसा चाले म्हणजे अजित दादा. जे पोटात असतं तेच ओठात असतं, ते अजित दादा.

ज्यांच्या दमाने महाराष्ट्र ओळखतो, ते अजित दादा. दादांची खासियत म्हणजे त्यांचा शब्द. दादांनी एकदा शब्द दिला की तो पूर्ण होणारच. दादा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, हीच राष्ट्रवादी शुभेच्छा. जय हिंद”

विराजने अजित पवार यांच्या एकूणच स्वभाव वैशिष्ट्यांची उजळणी करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शेतक-याच्या मुलाने अनोख्या स्टाईलने दिलेल्या या शुभेच्छा सध्या व्हायरल होत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.