Pune news: काच फुटल्याने पप्पा मारतील या भीतीने 9 वर्षीय मुलाने घर सोडले

एमपीसी न्यूज : मित्रांसोबत चौकात खेळत असताना काच फुटल्याने पप्पा मारतील या भीतीपोटी नऊ वर्षीय मुलगा घरातून निघून गेला आहे. बिबेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा नऊ वर्षीय मुलगा चैत्रबन वसाहत परिसरात खेळत होता. यावेळी चुकून त्याच्या हातातून काच फुटली. दरम्यान काच फुटल्याने पप्पा मारतील म्हणून नऊ वर्षीय मुलगा घरातून निघून गेला. त्याच्या आई-वडिलांनी संपूर्ण परिसरात याचा शोध घेतला परंतु तो सापडून आला नाही. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.