Pune News : बांधकाम शुल्क भरण्यास सवलतीमुळे पालिकेच्या तिजोरीत 90 कोटींचा भरणा ! 

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मिळकत कर आणि बांधकाम शुल्क विभागाचे उत्पन्न यंदाच्या वर्षी घटले आहे. बांधकाम विभागाच्या उत्पन्न वाढीसाठी तप्पाटप्प्याने बांधकाम शुल्क भरण्याची सवलत दिली आहे. ही सवलत दिल्यापासून 90 कोटी रुपयांचे उत्पन्न वाढल्याची माहिती मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.

कोरोना काळात पालिकेचा प्रचंड खर्च झाला आहे. परंतु, त्या पटीत उत्पन्न वाढलेले नाही. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. मागील दोन तीन वर्षांपासून पालिकेच्या बांधकाम विभागाचे उत्पन्न कमी होत गेले आहे. नोटबंदी आणि रेरा कायद्यामुळे बांधकाम व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाल्याने प्रस्ताव कमी झाले. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सहा तर सात महिने सर्व व्यवहार ठप्प होते. बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला. तसेच पालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने बांधकाम प्रस्ताव यावेत याकरिता बांधकाम शुल्क टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत उपलब्ध करून दिली. त्याला स्थायी समितीनेही मान्यता दिली. याचा फायदा होत असून त्यानंतर प्रस्ताव येण्यास सुरुवात झाली आहे. बांधकाम विभागाचे 130 कोटींवर गेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न कमी आहे. परंतु, कोरोना काळात बांधकाम विभागाचे उत्पन्न वाढण्यासाठी याचा फायदा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.