Pune News : पुणे जिल्ह्यात 90 लाख लसीकरणाचा टप्पा पार, सर्वाधिक लसवंतांचा जिल्हा

एमपीसी न्यूज : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्याला करोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे पुणे शहरासह ग्रामीणमध्ये ‘विशेष लसीकरण’ मोहीम राबवली जात आहे. शनिवारी जिल्ह्यात तब्बल दीड लाख लसीकरण झाले असून, शनिवारी जिल्ह्याने तब्बल 90 लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे.

कोविशिल्ड आणि कोवॅक्‍सिन लसींचा साठा मागील आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. विशेषत: ग्रामीणमध्ये एक ते दीड लाख लसी मिळत असून, काही खासगी कंपन्यांकडूनही लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात तब्बल पावणेतीन लाख लसीकरण झाले.

आतापर्यंतचे हे विक्रमी लसीकरण आहे. दरम्यान, या आठवड्यात एखाद-दुसरा दिवस सोडला, 90 हजार ते दीड लाखांच्या आसपास लसीकरण होत आहे. त्यामुळे लसीकरणाला गती मिळाली आहे. आता पहिला डोस बरोबर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. या लसीकरणामध्ये सातत्य ठेवण्यासाठी दोन्ही महापालिका आणि जिल्हा परिषदेकडून नियोजनबद्ध कार्यक्रम राबवत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.