Blood Donation : रक्तदान शिबिरात 90 जणांचा सहभाग

एमपीसी न्यूज – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वारजे येथील मॉडर्न शैक्षणिक संकुल व माजी विद्यार्थ्यी संघटना यांच्यावतीने आणि जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर (Blood Donation)  आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात 90 जणांनी रक्तदान केले.

 

Pimpri News: आत्मनिर्भर भारतासाठी ‘उडान’ उपक्रम प्रोत्साहनात्मक ठरेल – किरणराज यादव

 

या रक्तदान शिबिराचे  (Blood Donation) उद्घाटन सहधर्मदाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. गजानन एकबोटे,खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, स्थानिक नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका वृषाली चौधरी, संस्थेचे कार्यवाह प्रा.शामकांत देखमुख, सह कार्यवाह प्रा.सुरेश तोडकर व ज्योत्स्ना एकबोटे, चित्तरंजन भागवत, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.