Pimpri : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या 900 विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून केला स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास सादर

एमपीसी न्यूज – प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या 900 विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी सादर केलेल्या नाटिकेत महात्मा गांधींजीची दांडी यात्रा, इंग्रजांचा भारतीयांवर झालेला अत्याचार, मिठाचा सत्याग्रह, नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीयांचा विदेश कपड्यांवरील बहिष्कार, झाशीची राणी, मंगल पांडे, चंपारण्य सत्याग्रह, जालियनवाला बाग, 1940 चा भारत छोडो आंदोलन या सारख्या घटनांचा समावेश करण्यात आला होता.

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेनाचे औचित्य साधून शाळेतील सुमारे 900 विद्यार्थ्यांनी जरा याद करो कुरबाणी या धर्तीवर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची नाटिका विविध पारंपारिक वेशभूषेत साकारली. स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटना स्टेज वर जिवंत करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सादर केलेल्या नाटिकेत महात्मा गांधींजीची दांडी यात्रा, इंग्रजांचा भारतीयांवर झालेला अत्याचार, मिठाचा सत्याग्रह, नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीयांचा विदेश कपड्यांवरील बहिष्कार, झाशीची राणी, मंगल पांडे, चंपारण्य सत्याग्रह, जालियनवाला बाग, 1940 चा भारत छोडो आंदोलन या सारखे प्रसंग उभे करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, लोकमान्य टिळक या  महापुरुषांना यावेळी आगळीवेगळी श्रद्धांजली देण्यात आली. विद्यार्थ्यांचे कलागुण बघून उपस्थितांनी उस्त्फूर्त देत, भारत माता की जय, या घोषणेने सारा परिसर दुमदुमुन गेले.

_MPC_DIR_MPU_II

वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला विधी तज्ञ एस.के.जैन, सिने अभिनेत्री अस्मिता शेवाळे, कमला शिक्षण संकुलाच्या अध्यक्षा प्रतिभा शहा,प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे,प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हिस,पालक, विद्यार्थी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी  शाळेतील कला, क्रीडा, शैक्षणिक आदी क्षेत्रातील गुणवंतांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन समन्वयिका खुशनुमा सय्यद यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापिका रेणूका दारवेकर यांनी केले .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.