Vadgaon Maval : मावळ तालुक्यात पल्स पोलिओ मोहिमेला सुरुवात

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यात पल्स पोलिओ मोहिमेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेचे उदघाटन मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, वडगांव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे, पोटोबा देवस्थान विश्वस्त सचिव अनंता कुडे, भूषण मुथा, रवींद्र म्हाळसकर, प्रशांत रवणे, विस्तार अधिकारी सुधाकर महांकाळे, शिवाजी खिलारे, राजकुमार बाने, प्रदीप सोनावणे, आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते

या मोहिमेअंतर्गत 5 वर्षाच्या आतील सर्व बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत तसेच वीटभट्टी, टोल नाके, रेल्वे स्टेशन, बांधकाम प्रकल्प येथील लहान मुलांना डोस देण्यात येणार आहेत. एकही बालक हा डोस मिळण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे.

मावळ तालुक्यात एकूण 357 ठिकाणी पोलिओ बूथ या कामी सज्ज झालेले असून एकूण 46 हजार 981 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. याकामी एकूण 817 कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.