Pimpri : पिंपरी गावात साप चावल्याने चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – घराजवळ खेळत असताना साप चावल्याने एका चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरीगाव येथे रविवारी (दि. 10) रात्री घडली.

कृष्णा अपूर्व नाईक-राठोड (वय 4, रा. वाघेरे कॉलनी, पिंपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा रविवारी सायंकाळी आपल्या घराजवळ खेळत होता. खेळताना त्याने एका बिळामध्ये हात घातला. त्यावेळी त्याला सापाने चावा घेतला. यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.