BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : जमिनीच्या बांधाच्या कारणावरून भावकीचा वाद; शेतक-याला मारहाण

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – शेत जमिनीच्या बांधाच्या कारणावरून झालेल्या भांडणात चार जणांनी मिळून एकाला मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील वाकी खुर्द येथे शनिवारी (दि. 9) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

मेघा शांताराम कड (वय 25, रा. वाकी खुर्द, घोडदरी वस्ती, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रणय कड आणि त्याचे तीन साथीदार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंडलिक कड असे जखमी शेतक-याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेघा यांचे सासरे कुंडलिक आणि आरोपींचे शेतीच्या बांधावरून मागील काही दिवसांपासून भांडण सुरु होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी शनिवारी रात्री कुंडलिक यांना हाताने आणि लाकडी दांडक्याने मारहाण करत शिवीगाळ केली. यामध्ये कुंडलिक जखमी झाले. याबाबत त्यांची सून मेघा यांनी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. आरोपींना अद्याप अटक करण्यात आले नाही. पोलीस उपनिरीक्षक पासलकर तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.