Pimpri : एमपीएससी परीक्षेत 42 वी आलेल्या स्वाती धोंगडे हिचा सत्कार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) 2017 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत स्वाती अच्युत धोंगडे ही महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गात मुलीमध्ये राज्यात 42 वा क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल पिंपळे सौदागरमध्ये नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शीतल नाना काटे यांनी तर श्रीनगर रहाटणी येथे खादी ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष हेमंत तापकीर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

सत्काराच्या वेळी नगरसेविका सुनीता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत नखाते, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज तापकीर, भाजपाचे उपाध्यक्ष हरेश तापकीर उपस्थित होते. यावेळी नाना काटे म्हणाले की, कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे स्वातीने दाखवून दिलेले आहे. स्वातीचा हा आदर्श अनेक मुलांमुलीनी घ्यावा. परिस्तिथीमुळे खचून न जाता आत्मविश्वासाने आपल्या ध्येयाकडे पाहावे असे आवाहन नाना काटे यांनी केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2017 ( एमपीएससी ) चा घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच 8 मार्च 2019 रोजी जाहीर करण्यात आला.या परीक्षेमध्ये राज्यातील तीन लाख 30 हजार 909 उमेदवार आयोगामार्फत घेतलेल्या सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त ( पूर्व ) परीक्षा घेण्यात आली. यातून पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेसाठी 10हजार 31 उमेदवारांची निवड झाली. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी दोन हजार ७६३ उमेदवार पात्र ठरले होते या 2 हजार 763 उमेदवारांमध्ये खुल्या प्रवर्गात मुलीमध्ये स्वाती धोंगडे हिचा 42 वा क्रमांक आला आहे.

स्वातीच्या घरातील परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे, स्वातीचे मुळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील कन्हेरवाडी असून सध्या धोंगडे कुटुंब काळेवाडी येथे राहते. स्वातीचा जन्म काळेवाडीतील. स्वातीला लहानपणापासून खाकी वर्दीचे आकर्षण होते. ही वर्दी आपल्या अंगावर मानाने चढवली जायला हवी असे तिचे स्वप्न होते. म्हणून स्वातीने स्पर्धा परीक्षाची तयारी सुरु केली. वडील ड्रायवरची नोकरी करतात तर आई घरकाम करते. आपल्या मुलीची शिक्षणाची आवड बघून, स्वातीला स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. शेवटी स्वातीने आपल्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण केल आणि ती यशस्वी झाली. स्वातीचे 1 ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण काळेवाडी येथील तापकीर शाळेत झाले 12 चे शिक्षण एम.एम.कॉलेज काळेवाडी येथे झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.