Hinjawadi : खिडकीचे गज कापून हजारोंचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. त्यावाटे घरातून सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम असा एकूण 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 10) रात्री उघडकीस आली.

चंदा सुभाष कुलकर्णी (वय 52, रा. विज्ञाननगर, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंदा यांचा बंगला 8 ते 10 मार्च या कालावधीत कुलूप लावून बंद होता. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या खिडकीचे गज कापून बंगल्यात प्रवेश केला. बेडरूममधील पत्र्याच्या कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि किचन मधील पत्र्याच्या कपाटात ठेवलेली रोख रक्कम असा एकूण 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक वल्टे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.