BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : शुक्रवारपासून तीन दिवसीय गणेश व्याख्यानमाला

0 151
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला श्री गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव कालनी, तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथे शुक्रवार दि 15 मार्च पासून रोज सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

.

या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प शुक्रवारी (दि 15) ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. किसनमहाराज चौधरी हे ‘पसायदान’या विषयावर गुंफतील.

शनिवारी (दि. 16) ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे ‘हे जीवन सुंदर आहे!’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफणार असून व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प रविवारी (दि. 17) हास्यकवी बंडा जोशी, अनिल दीक्षित आणि भालचंद्र कोळपकर यांच्या ‘हास्य मैफल’ या विनोदी आणि विडंबन कवितांनी गुंफले जाणार आहे.

व्याख्यानमालेसाठी अनुक्रमे डॉ. पांडुरंग भानुशाली, प्रभाकर ओव्हाळ, सुरेश साखवळकर आणि राजेंद्र घावटे हे प्रमुख पाहुणे लाभले असून शुक्रवार, दिनांक १५ मार्च रोजी तळेगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे.

या प्रसंगी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, नगरसेविका नीता काळोखे, नगरसेविका काजल गटे, नगरसेवक गणेश खांडगे, नगरसेवक संतोष भेगडे, नगरसेवक संतोष शिंदे उपस्थित राहणार आहेत. सर्व नागरिकांनी या व्याख्यानमालेचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले यांनी केले आहे.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: