BNR-HDR-TOP-Mobile

शिमगा या आगामी चित्रपटातील मन गुणगुणतंय…..गाणे प्रकाशित (व्हिडिओ)

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- दिनांक 15 मार्च ला प्रदर्शित होणाऱ्या …शिमगा’ या चित्रपटातील नवीन गाणं ‘गुणगुणतंय’ रिलीज करण्यात आले आहे. भूषण आणि मानसी यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं एक रोमँटिक गाणं आहे.

गाण्याची सुरुवात मानसीच्या गृह्प्रवेशाने होते. लग्नानंतर फुलात जाणारं हळुवार प्रेम या गाण्यात अगदी हुबेहूब दाखवण्यात आले आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून ‘त्या’ दोघांमधलं गोड नातं ते व्यक्त करत आहे. मानसीसाठी पोळी लाटणारा भूषण आणि त्याला घास भरवणारी मानसी हा सीन अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आला आहे.

प्रेमाचे विविध रंग या गाण्यात आपल्याला जाणवतात.सिनेमातील नायिका मानसी पंड्यासुद्धा सोज्वळ अशी नवीन नवरी दिसत असून दोघांमधील प्रेमाची कळी खुलताना गाण्यात दाखवली आहे. हे गाणं चित्रित करताना मानसी खूपच नर्वस होती. तिचा पहिलाच चित्रपट आणि रोमँटिक गाण्याचे शूटिंग. हे शूटिंग करताना ती अवघडलेली होती. परंतु चित्रपटाचे दिग्दर्शक आणि भूषण यांनी तिला शूटिंगला खूप मदत केली.

गाण्याचे नृत्यदिग्दर्शन दीपाली विचारे यांनी केले आहे. श्री केळमाई प्रोडक्शन निर्मित ‘शिमगा’ हा सिनेमा १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन निलेश कृष्णा यांनी केले आहे. या सिनेमामध्ये राजेश शृंगारपुरे, भूषण प्रधान, कमलेश सावंत, मानसी पंड्या, विजय आंदळकर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3