BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : दोन तरुणांना टोळक्याची मारहाण

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – नऊ जणांच्या टोळक्याने दोन तरुणांना विनाकारण मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 14) सकाळी सव्वादहाच्या सुमारास खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडली. 

मयूर मधुकर तरस (वय 26, रा. सावरदरी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कुणाल विकास धोडगे, मंगेश महादू गाढवे, अविनाश महादू गाढवे (तिघे रा. सावरदरी, ता. खेड), अक्षय बाळासाहेब गाडे (रा. शेलू, ता. खेड) आणि त्यांचे चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर आणि त्यांचे चुलत भाऊ गणेश तुकाराम तरस हे दोघे रस्त्याने जात होते. ते सावरदरी येथील लिक्विड कंपनी चौकात आले असता आरोपींनी कार आडवी लावून दोघांना अडवले. आरोपींनी मयूर आणि गणेश यांना लाकडी दांडका आणि लोखंडी गजाने मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.