BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : कौसल्या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- बोपखेल येथील कौसल्या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा पहिला वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वच्छता दूत असलेल्या 51 महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समुपदेशक शुभांगी साळवी होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या नंदा फुगे, रोहिणी मांढरे, राजश्री शहा, कल्पना पाटील, उज्ज्वला कुंभार, स्मिता घुले आदी उपस्थित होत्या.

संस्थेच्या अध्यक्षा प्रा. सरला चौधरी यांनी संस्थेच्या एक वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच महिलांसाठीचे रोजगाराचे विविध मार्ग, योजना या विषयीची माहिती देण्यात आली. संस्थेच्या उपाध्यक्षा गायत्री तळेकर, सचिव ऍड राजश्री माने संगीता थोरात, आशा पानसरे आदींनी संयोजनात पुढाकार घेतला.

.