Pimpri : थोबाडीत मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – थोबाडीत मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना डिलक्स चौक, पिंपरी येथे गुरुवारी रात्री घडली.

मंजीत प्रसाद (रा. काळेवाडी) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोहन संभाजी देवकते (वय 25, रा. चंदननगर, पुणे) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी देवकाते हे आपल्या टेम्पो ट्रॅव्हलर मधून कामगारांना सोडविण्यासाठी चालले होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास ते पिंपरीतील डिलक्स चौक परिसरात आले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी टेम्पो ट्रॅव्हलरच्या पुढे दुचाकी आडवी घालत टेम्पो चालकाला गाडी उभी करण्यास भाग पाडले. त्यांनी टेम्पो चालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यामुळे टेम्पोत बसलेल्या मंजीत यांनी ‘क्यों क्या हुआ’ अशी विचारणा त्या दुचाकीवरील तरुणांना केली. त्यापैकी एकजणाने खिडकीतून हात घालत मंजित यांच्या थोबाडीत मारली. थोबाडीत का मारली? असा विचारण्यासाठी मंजीत खाली उतरले. त्यावेळी पाच जणांनी लाथा बुक्क्यांनी त्यास मारहाण केली. त्यानंतर मंजित यांच्यावर धारदार शस्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या मंजित यांच्यावर थेरगाव येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like