Pune : उंड्री परिसरातून 91 लाखाचे कोकेन जप्त; एका नायजेरियन व्यक्तीला अटक

गारमेंट व्यवसायाच्या आड कोकेन विक्री; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – पुण्यातील उंड्री परिसरातून तब्बल 90 लाखांचे कोकेन जप्त करीत एका नायजेरीन व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.

शोलाडॉये सॅम्युअल जॉय (वय 44), असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांना उंड्री परिसरात कोकेन विकत असून कप्स्टोन सोसायटी या उच्चभ्रू परिसरात तो भाड्याने फ्लॅट घेऊन राहत आहे, अशी माहिती मिळाली.  तसेच  या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून आरोपी जॉय याच्याकडून 88 लाखाचे कोकेन जप्त केले.

आरोपी जॉय हा भारतात फेब्रुवारी महिन्यात बिझनेस व्हिसा घेऊन आला होता. यावेळी त्याने कपड्यांचा व्यवसाय करणार असल्याचे त्याने व्हिजा मिळवताना सांगितले होते, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता पुण्यातील एनआयबीएम रोड येथील उच्चभ्रू वस्तीत कोकेन विकत असल्याची माहिती दिली.

दरम्यान, पोलीस याप्रकरणात आरोपीसह आणखी कोणकोणाचा समावेश आहे याचा तपास घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.