Dehugaon : तुकाराम बीजनिमित्त वारकऱ्यांसाठी वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत वैद्यकीय दवाखाना

एमपीसी न्यूज- श्री क्षेत्र देहू येथील गाथा मंदिरात संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठगमन सोहळा व तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त हजारो वारकरी दाखल झाले आहेत. वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टतर्फे मोफत वैद्यकीय दवाखाना चालू करण्यात आला असुन वारकरी त्या सेवेचा लाभ घेत आहेत.

श्री क्षेत्र देहू संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठगमन सोहळा व तुकाराम बीज निमित्त येथे अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण आयोजित केला आहे. या सोहळ्यात हजारोच्या संख्येत आलेल्या वारकऱ्यांसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टतर्फे मोफत वैद्यकीय दवाखाना चालू करण्यात आला आहे. यामध्ये रक्त व डायाबिटीस तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.