BNR-HDR-TOP-Mobile

Pune : एसएई तिफण 2019′ राष्ट्रीय स्पर्धेत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय विजेते

'सेल्फ प्रॉपेल्ड ओनियन हार्वेस्टर ' निर्मिती राष्ट्रीय स्पर्धेचे पारितोषिक वितरण

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (एसएई इंडिया) आयोजित ‘ एसएई तिफण 2019’ स्पर्धेत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय (संगमनेर)ला प्रथम क्रमांक मिळाला . महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथे झालेल्या ‘सेल्फ प्रॉपेल्ड ओनियन हार्वेस्टर ‘ निर्मिती राष्ट्रीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 20 मार्च रोजी राहुरी येथे झाला .

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (एसएई इंडिया ) ने जॉन डिअर , कमिन्स ,महिंद्रा अँड महिंद्रा ,किर्लोस्कर , बीकेटी ,अलटायर ,आन्सीस ,एआरएआय यांच्या सहकार्याने या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले होते.

पदमभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (सांगली ) यांना द्वितीय तर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (कोल्हापूर ) यांना तृतीय क्रमांक मिळाला . स्पर्धेत देशातील २६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला .या स्पर्धेमध्ये पहिले पारितोषिक २ लाख रुपये ,दुसरे एक लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ५० हजार पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले .

डॉ . के . पी विश्वनाथ (कुलगुरू ,महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी ),डॉ . इंद्र मणी (अध्यक्ष ,आयएसएई), डॉ . डी डी पवार (अधिष्ठाता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी ),ट्रॉयडेन क्रुझ (वरिष्ठ सरव्यवस्थापक ,जॉन डियर टीसीआय ),निलेश पाठक (प्रमुख ,मॉड्युल इंजिनियरिंग,जॉन डियर इंडिया ), संदीप महाजन (सरव्यवस्थापक, जॉन डियर आणि समन्वयक, तिफण २०१९) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. शेतातील कांदा सहज काढण्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त असे ‘सेल्फ प्रॉपेल्ड ओनियन हार्वेस्टर’ हे यंत्र निर्मितीचे आव्हान विद्यार्थ्यांना देऊन ही स्पर्धा झाली. अभिनवता, उत्पादकता, इंधनाची बचत, निर्मिती खर्च, यंत्र वापरातील सहजता या मुद्द्यांवर तज्ज्ञांनी परीक्षण केले.

18 मार्च रोजी स्पर्धेचे उदघाटन राहुरी येथे झाले. संदीप महाजन यांनी स्वागत केले. अभिनव वराडे यांनी स्पर्धेची माहिती दिली. संजय निबंधे यांनी सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (एसएई इंडिया ) चा स्पर्धा आयोजनामागचा हेतू सांगितला. निलेश पाठक यांनी ऑफ हायवे बोर्ड च्या कामाची माहिती दिली. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांपुढील आव्हानांचा उल्लेख करून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कौशल्याना वाव देणाऱ्या या अभिनव स्पर्धेचे कौतुक केले.

बेस्ट डिझाईन पारितोषिक अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, बेस्ट कॉस्ट पारितोषिक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (जबलपूर ), बेस्ट प्रॉडक्टिव्हिटी पारितोषिक छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (औरंगाबाद ), बेस्ट सेल्स -मार्केटिंग पारितोषिक दयानंद सागर विद्यापीठ (बंगळुरू ), बेस्ट फ्युएल इकॉनॉमी पारितोषिक डॉ शिंदे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (राहुरी ) याना मिळाले.

.

HB_POST_END_FTR-A1
.