BNR-HDR-TOP-Mobile

Pune : प्रेमप्रकरणातून निकाह केल्याने भावानेच केला बहिणीच्या नवऱ्याचा खून

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- प्रेमप्रकरणातून लग्न केल्याच्या रागातून भावाने बहिणीच्या पतीचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना पुण्यातील कॅम्प परिसरात शनिवारी (दि. 22) रात्री घडली.

सुलतान महंमद हुसेन सय्यद (वय 24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार अरबाज कुरेशी व त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याचे समोर आले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुलतान सय्यद हा पुण्यातील कॅम्प परिसरात नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करतो. सुलतान याने एक वर्षांपूर्वी प्रेमप्रकरणातून लग्न केले होते. मात्र मुलीच्या कुटुंबियांना हा विवाह मान्य नसल्यामुळे त्यांच्यात अनेकवेळा वाद झाले होते.

शनिवारी (दि. २२) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अरबाज शेख आणि त्याचे साथीदार सुलतान सय्यद नारळपाणी विक्री करत असलेल्या ठिकाणी आले. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. अरबाज आणि त्याच्या साथीदारांनी सुलतानला बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून तेथून पळून गेले. जवळच्या नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या सुलतानला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.