BNR-HDR-TOP-Mobile

Manchar : बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पाच वर्षाची चिमुरडी ठार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून एका पाच वर्षाच्या मुलीला ठार केले. ही घटना आंबेगाव तालुक्यातील साकोरे येथे रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मक्याचा शेतात घडली. साकोरे परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून नागरिकांमघ्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रुतिका महेंद्र थिटे (वय5  रा. जऊळके खुर्द, ता.खेड ) असे या चिमुरडीचे नाव आहे.

या बाबत माहिती अशी की, श्रुतिका व तिची आई स्वाती महेंद्र थिटे या मामा अंकुश कडूसकर यांच्याकडे पाच दिवसापूर्वीच राहण्यास आल्या होत्या. घरासमोरील शेतात आज्जी कुसुम कडूसकर व स्वाती थिटे या जनावरांसाठी मका कापत होत्या. जवळच श्रुतिका खेळत होती. मक्याच्या पिकात दबा धरून बसलेला बिबट्या अचानक हल्ला करून श्रुतिकाला जबड्यात उचलून पळू लागला. आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक धावून आले. तो पर्यंत बिबट्याने श्रुतिकाला टाकून तिथून पळ काढला.

हल्ल्यामध्ये श्रुतिकाच्या गळ्याला गंभीर जखम झाली. प्रदीप कडूसकर यांनी तिला तात्काळ आपल्या वाहनातून मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. बिबट्याने श्रुतिकाच्या गळ्याला चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

साकोरे ग्रामस्थांनी वनपरिमंडळ अधिकारी सोमनाथ कुंटे याना व मंचर पोलीस ठाण्याला घडलेल्या प्रकारची माहिती दिली. वनखात्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गाढवे यांनी घटनास्थळी भेट दिली. मंचर उपजिल्हा रुग्णालयाला खेड आंबेगाव व जुन्नर तालुक्याचे सहाय्यक वनरक्षक श्रीमंत गायकवाड, मंचर पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

दरम्यान, वनखात्याकडून संपूर्ण वैद्यकीय खर्चापोटी तीन लाख रुपयांची रक्कम तसेच नुकसान भरपाई म्हणून १२ लाख रुपये थिटे कुटुंबियांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे श्रीमंत गायकवाड यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A4

.