Vadgaon Maval : विविध उपक्रमांनी शिवजयंती महोत्सव साजरा

एमपीसी न्यूज- तीन दिवस चाललेल्या शिवजयंती महोत्सवात वडगाव मावळ येथे मानाची दगडी गोटी उचलणे, खेळ रंगला पैठणीचा, निबंध, रांगोळी, वक्तृत्व यासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वडगाव शहरातुन शिवप्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. त्यानतंर पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात झालेल्या समारंभात उत्सव समितीच्या वतीने श्रीमती पुष्पाताई केशवराव वाडेकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार, कु स्वाती किसन दाभाडे यांना मावळरत्न पुरस्कार, हभप सुजित व अजित वसंत लोहर यांना संगीतरत्न पुरस्कार, तर कु शुभम तानाजी तोडकर यांना खेळरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, माऊली दाभाडे, मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उत्सव समितीचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, सुनील शेळके, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, नगराध्यक्ष मयूर ढोरे, बाळासाहेब म्हाळसकर, ज्ञानेश्वर ढोरे, जि प सदस्या शोभा कदम , नगरसेवक किरण म्हाळस्कर, प्रवीण चव्हाण, अॅड विजय जाधव, राजेंद्र कुडे, माय कारचे देशमुख आदी उपस्थित होते.

शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शामराव ढोरे यांनी स्वागत केले तर प्रास्ताविक संस्थापक भास्करराव म्हाळसकर यांनी केले. सूत्रसंचालन अनंता कुडे यानी तर आभार अतुल राऊत यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.