Maval : ट्रॅफिकचा फटका ! पार्थ पवार धावतच सभास्थळी दाखल

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांना ट्रॅफिकला सामोरे जावे लागले. ट्रॅफिकमध्ये अडकल्याने सभेला पोहचायला उशीर होऊ नये म्हणून गाडीतून उतरून पार्थ यांनी धावत सभेच्या ठिकाणी जाणे पसंत केले.

पार्थ पवार काल कर्जत, पवनेल, उरण परिसरात प्रचारासाठी गेले होते. त्यांच्या प्रचारार्थ रात्री पनवेल येथे सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला जात असताना पार्थ ट्रॅफिकमध्ये अडकले. त्यामुळे सभेला जायला उशीर होण्याची शक्यता होती. त्यामुळे पार्थ गाडीतून खाली उतरले आणि धावत सुटले. धावतच त्यांनी सभेचे ठिकाण गाठले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सभा, प्रचाराच्या ठिकाणी उशिराने पोहचण्यावरून त्यांना टीकेला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांनी आज उशीर होऊ नये. यासाठी धावतच सभेच्या ठिकाणी जाणे पसंत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.