Sangvi : पैशाच्या वादातून भावावर वार

एमपीसी न्यूज- पैशांच्या वादातून मावस भावाने भावावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (दि. 30) रात्री साडेबाराच्या सुमारास जुनी सांगवी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राजेश टारझन कुलकर्णी (रा.सांगवी) असे जखमी भावाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी वर्षा कुलकर्णी (वय 30, रा.जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली असून राजू रघु बंगेरा (वय 26, रा.मधुबन सोसायटी, जुनी सांगवी) याला अटक करण्यात आली आहे.

जखमी व आरोपी हे मावस भाऊ आहेत. दोघांमध्ये पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद होते. या वादातून शनिवारी रात्री राजू हा राजेश यांच्या घरी आला. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. राजू याने राजेश यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी कोयत्याने डोक्यावर, हातावर, मानेवर वार केले. यामध्ये राजेश गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी राजुला अटक केली असून पोलीस उपनिरक्षक साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.