Nigdi : ट्रक घेऊन देणे पडले महागात

एमपीसी न्यूज- हप्ते भरण्याच्या अटीवर एकाला ट्रक घेऊन दिला असता त्याने एकही हप्ता न भरून तसेच ट्रकही परत न देता 8 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी सोमवारी (दि.8) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी मोहम्मद अमजद मुस्ताक खान (वय 33, रा.ट्रान्सपोर्टनगर, निगडी) यांनी फिर्याद दिली असून मोहम्मद समद उर्फ बबलू फतेह अली खान (वय 33, रा.दुर्गनगर, निगडी, मुळगाव बिहार) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांनी आरोपीला त्याने हप्ते भरण्याच्या अटीवर स्वतःच्या नावे 8 लाख रुपये किमतीचा ट्रक (एमएच 06 एक्यू 9987) घेऊन दिला. मात्र आरोपीने जून 2018 पासून ट्रकचा एकही हप्ता भरला नाही. तसेच ट्रक परत न देता मूळगावी पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.