Chinchwad : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मिळाल्या आणखी पाच मोटार

सीएसआर फंडातून महिंद्रा कंपनीचा पुढाकार

एमपीसी न्यूज- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपुऱ्या वाहनांमुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोरील अडचणी वाढल्या होत्या. दरम्यान महासंचालकांनी आयुक्तालयाला सीएसआर फंडातून वाहने मिळवण्यासाठी हिरवा कंदील दिला होता. त्यानुसार वोक्सवॅगन कंपनीने पाच गाड्या दिल्यानंतर बुधवारी (दि. 10) महिंद्रा कंपनीच्या आणखी पाच जीप आयुक्तालयात दाखल झाल्या.

आयुक्तालयाच्या आवारात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महिंद्रा कंपनीचे अधिकारी विजय कलरा यांच्या हस्ते पोलीस आयुक्त पद्मनाभन यांना वाहने देण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, महिंद्रा कंपनीचे अधिकारी यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सीएसआर फंडातून वाहने मिळवण्याचा मार्ग मोकळा झाल्यांनतर स्वतः पोलीस आयुक्तांनी चाकणमधील कंपन्यांना मदतीसाठी आवाहन तसेच पाठपुरावा केला होता. त्यानुसार एका आठवड्यापूर्वी वोक्सवॅगन कंपनीने पाच वाहने दिली. त्यानंतर बुधवारी महिंद्रा कंपनीने पाच बोलेरो जीप आयुक्तालयाला दिल्या. तसेच आगामी काळात निवडणुकीच्या पूर्वी आणखी काही मोटार तसेच दुचाक्या आयुक्तालयात दाखल होण्याची शक्यता आहे. यावेळी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी कंपनीचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.