BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 वी जयंती वडगाव मावळमध्ये विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

सकाळी पुणे ते वडगाव मावळ भीमज्योतीचे आयोजन करण्यात आले. भीमज्योतीचे स्वागत वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे तसेच नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे, राहुल ढोरे, अनिल ओव्हाळ यांनी केले.

यानंतर दुपारी वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी समाज मंदिर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सायंकाळी 7 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र ओव्हाळ, अमोल गायकवाड, रवींद्र ओव्हाळ, दीपक भालेराव, प्रवीण भालेराव, स्वप्नील वाघमारे, नितीन ओव्हाळ, अजय भवार, अतुल ओव्हाळ, सचिन ओव्हाळ, सिद्धार्थ भालेराव यांनी केले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.