BNR-HDR-TOP-Mobile

Shirur: …..अन् राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे दुचाकीवरून प्रचाराला रवाना

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे प्रचारासाठी जात असताना खेडमध्ये कंटेनर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सभेच्या ठिकाणी नागरिकांना ताटकळत थांबावे लागू नये यासाठी डॉ. कोल्हे यांनी वेळ न घालवता त्वरित कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून प्रचाराला रवाना झाले.

डॉ. अमोल कोल्हे आज, मंगळवारी जुन्नर दौऱ्यावर आहेत. प्रचारासाठी ते सकाळी लवकर निघाले होते. खेडमध्ये कंटेनर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत डॉ. कोल्हे देखील अडकले. डॉ. कोल्हे यांनी अपघातात कोण जखमी झाले की नाही याची खातरजमा केली. सर्वांची आपुलकीने चौकशी केली.

त्यानंतर कार्यक्रमाला विलंब होऊ नये. कार्यकर्त्यांना ताटकळत थांबावे लागू नये. यासाठी डॉ. कोल्हे यांनी कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून प्रचाराला जाणे पसंत केले.

अनेकदा नेत्यांना नियोजित सभास्थळी पोहचण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरते. डॉ. कोल्हे यांनी आपल्यामुळे कार्यकर्त्यांना ताटकळत बसावे लागू नये यासाठी दुचाकीवरून प्रवास केला.

HB_POST_END_FTR-A4

.