Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे रोटरी क्लब तर्फे 23 वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे रोटरी क्लब तर्फे 23 वा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (दि. 14) तळेगाव दाभाडे येथे उत्साहात पार पडला. या विवाहसोहळ्यात 20 जोडप्यांचा विवाह होऊन या जोडप्यांची वैवाहिक जीवनाला सुरुवात केली.

या विवाहसोहळ्यासाठी मावळ व खेड तालुक्यातुन आलेली एकूण 20 जोडप्याची लग्ने संध्याकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी लावण्यात आली. या विवाहसोहळ्याला वधु-वरांना आशीर्वाद देण्यासाठी रोटरीचे प्रांतपाल रो. डॉ. शैलेश पालेकर, नियोजित प्रांतपाल रो. पंकज शहा, सीआरपीफचे डीआयजी बिरेंद्रजी टोप्पो, रो. सुनील शेळके, रवींद्र भेगडे व समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वधु-वरांना अनेक भेटवस्तु देण्यात आल्या. वधुला साड्या, परकर, ओढणी इ. तर वराला सफारी सुट उपरणे, सिलेंडर सहीत गॅस कनेक्शन देण्यात आले. प्रवीण सोनी यांच्या सौजन्याने चांदीचे लक्ष्मीयंत्र, सुभाष राठोड यांच्या सौजन्याने वधू-वरांना संसारोपयोगी भांडी देण्यात आली तर शरद म्हस्के यांच्या सौजन्याने प्रत्येकाला सोनाटा कंपनीचे मनगटी घड्याळ भेट म्हणून देण्यात आले.

भाग्यवान जोडप्यासाठी पु. ना. गाडगीळ यांच्या सौजन्याने मिळालेल्या पाच ग्रामच्या दोन सोन्याच्या अंगठ्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये चि. सौ. का. सपना राजेश लोहकरे, रा. इंगळूण, ता.मावळ. व चि. आकाश कांताराम कोकाटे, रा. शिव कॉलनी, वराळे हे वधुवर या ड्रॉ चे मानकरी ठरले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष रो. बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष व प्रकल्पप्रमुख शंकर जाधव, माजी अध्यक्ष रो. यादवेंद्रजी खळदे, रो. सुनील शेळके, रो. अशोक काळोखे, रो. महेश महाजन, रो. विश्वनाथ मराठे, रो. प्रसाद मुंगी, प्रभाकर निकम, विलास जाधव यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

तसेच क्लबचे सदस्य रो. उद्धव चितळे, स्वानंद आगाशे, श्रीशैल मेंथे, कैलाश देसले, शिवाजी आगळे, जयवंत देशपांडे, अतुल हंपे, आनंद आसवले, राजन आम्ब्रे, देवेद्र कदम, निलेशकुमार वाघचौडे, विष्णुपंत बच्चे, डॉ. ज्योती मुंडर्गी, दीपक शहा, सुधाकर शेळके, विजय काळोखे, सचिन चोपडे, बॉबी लाला, डॉ. प्रभाकर गुणे यांनी आर्थिक मदतीसह सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.