BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणावर वार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत नाचत असताना पूर्वीच्या वादातून एकावर वस्तऱ्याने वार केले. रविवारी (दि. 14) रात्री दहाच्या सुमारास पिंपरीतील गणेश हॉटेलजवळ ही घटना घडली.

अनिकेत बापू सरोदे (वय-23 रा.पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन सुर्वे (वय-30 रा. पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी व फिर्यादी यांच्यात पूर्वीचे वाद होते. रविवारी अनिकेत हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक पाहण्यासाठी गेला. त्यावेळी त्याच्या मित्रानी त्याला नाचण्यासाठी बोलवले. नाचत असताना पूर्वीच्या भांडणाच्या रागातून सुर्वे याने अनिकेत व त्याच्या मित्रांना मारहाण करीत अनिकेतच्या मानेवर वस्तऱ्याने वार करून जखमी केले. यामध्ये फिर्यादी यांच्या मित्राचा मोबाईलही गहाळ झाला. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.