BNR-HDR-TOP-Mobile

Dighi : महिलेचे लाखाचे गंठण हिसकावले

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- पतीसह दुचाकीवर जात असणाऱ्या महिलेचे लाखाचे गंठण चोरटयांनी हिसकावले. या प्रकरणी सोमवारी (दि. 16) दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी मिनाराधा किसन करंजुले (वय-40 रा.पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली असून दोन दुचाकीस्वार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी या 31 मार्च रोजी त्यांच्या पतीसह दुचाकीवर आळंदीवरून मॅगझिन चौकाकडे येत होत्या. त्यावेळी दोन दुचाकीस्वार चोरटे त्यांचा पाठलाग करीत आले. त्यापैकी एकाने फिर्यादी यांच्या गळ्यातील 90 हजार रुपये किंमतीचे चार तोळे 37 ग्रॅम वजनाचे गंठण हिसकावून पोबारा केला. घटनेनंतर फिर्यादी महिला आजारी पडल्या. त्यांची प्रकृती सुधारली असता सोमवारी त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.