Maval : शहरातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनाच निवडून द्या – गौतम चाबुकस्वार

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप- शिवसेना-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे हे आपल्या शहरातील रहिवाशी आहेत. सक्षम उमेदवार आहेत. मागील पाच वर्षातील त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. सलग पाच वर्षे त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन शिवसेना आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी केले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप- शिवसेना-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी, संत तुकारामनगर येथील संत तुकाराम महाराज मंदिरात सोमवारी (दि.15) आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, भाजपच्या प्रदेश नेत्या उमा खापरे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेविका सुजाता पालांडे, नगरसेवक माऊली थोरात, भाजपचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास कुटे, प्रभागाचे स्वीकृत सदस्य कुणाल लांडगे, भाजपचे शहर सरचिटणीस संजय मंगोडेकर, आरपीआयचे शहराध्यक्ष सुधाकर वारभूवन, रमेश चिमुरकर, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, वसंत शेवडे, राजेश वाबळे, अभिजित गोफण, महेंद्र बावीसकर, मंगेश धाडगे यावेळी उपस्थित होते.

आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 30 वर्षानंतर पहिल्यांदाच स्थिर सरकार आले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी खासदार बारणे यांना निवडून देऊन मोदी यांचे हात बळकट करा” असे आवाहन त्यांनी केले.

सदाशिव खाडे म्हणाले, “मावळ लोकसभा मतदारसंघावर बारामतीकरांनी अतिक्रमण केले आहे. त्यांच्याकडून वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपले काही काम असेल तर बारामतीला भेटायला जाणार का?, त्यासाठी स्वच्छ चारित्र्य, कर्तृत्ववान असलेले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून द्यावे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला संत तुकारामनगरमधील नागरिक सातत्याने भाजप-शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मोठे मताधिक्य देतात. त्यामुळे यावेळी देखील संत तुकारामनगरमधून मोठे मताधिक्य मिळेल. परंतु, कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत झपाट्याने काम करावे”

चद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, “केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्ताखालील सरकारची आवश्यकता आहे. त्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून द्या. मागील पाच वर्षात बारणे यांनी उत्तम काम केले आहे. सलग पाच वर्षे त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे”

उमा खापरे म्हणाल्या, “महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे काम चांगले आहे. त्यांनी संसदेत प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे बारामतीकरांना बारामतीतच ठेवा. शहरातील खासदाराला संसदेत पाठवा” अमित गोरखे म्हणाले, “सर्वांनी सतर्क राहून प्रचार करावा. शेवटच्याक्षणी अनेक प्रलोभने येतील. त्याला बळी पडू नका. आपला महायुतीचा उमेदवार ताकदीचा आणि सक्षम आहे. त्यांना संत तुकारामनगरमधून मोठे मताधिक्य द्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.