Sangvi : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाचा खून

एमपीसी न्यूज- पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने एकाचा धारदार शस्त्राने वार करीत खून केला. सांगवी येथे ढोरेनगर परिसरात मंगळवारी (दि. 16) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

अशोक लक्ष्मण बिरादार (वय 32, रा. सुसगाव, मूळ- कर्नाटक) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर लक्ष्मण खुटेकर (वय 30, रा. ढोरेनगर, सांगवी) असे आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणी गुरूबाळाप्पा बिरादार यांनी फिर्याद दिली आहे.

अशोक हा वाहनचालक असून आरोपी लक्ष्मण यांच्या ओळखीचा होता. त्याचे आरोपीच्या घरी येणे जाणे होत असे. लक्ष्मण घरी नसतानाही अशोक वारंवार त्यांच्या घरी येत असे. अशोकचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या लक्ष्मणला संशय होता यामुळे पतिपत्नीत वारंवार वाद होत असे.

मंगळवारी रात्री अशोक पुन्हा त्यांच्या घरी आला. त्यावेळी लक्ष्मण घरातच होता. संतापलेल्या लक्ष्मणने अशोकवर धारदार शास्त्राने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर घटनास्थळाहून पळ पढला. घटनेची माहिती मिळतंच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या लक्ष्मणला रात्री उशिरा अटक करण्यात आली. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.