Pimpri : महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

एमपीसी न्यूज – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणेचे मॉडर्न शैक्षणिक संकुल यांच्या वतीने दिला जाणारा पिंपरी- चिंचवड समाजभूषण पुरस्कार यंदा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना जाहीर झाला आहे.

निगडी येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलात रविवारी (दि.21)सायंकाळी आठ वाजता पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. हे पुरस्काराचे 15 वे वर्ष असून शहराच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणा-या व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जात असतो. स्मृतिचिन्ह , मानपत्र , पुणेरी पगडी , शाल , श्रीफळ, रोपटे, पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप असते, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे व संकुलाचे समन्वयक शरद इनामदार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.