Pimple Gurav : पीएमपी बसखाली आल्याने दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज- रस्ता ओलांडत असताना पीएमपी बसखाली आल्याने दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. 17) सकाळी साडेनऊच्या सुमारास पिंपळे गुरव बस स्थानकावर घडली. याप्रकरणी बसचालकाला अटक करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

लक्ष्मी सुनील जंगम (वय-24 रा. मोहननगर, चिंचवड) असे मृत मुलीचे नाव असून गणेश तुकाराम सोंडगे (वय-30 ) असे अटक बस चालकाचे नाव आहे.

लक्ष्मी ही नवी सांगवी येथे एका खासगी मार्केटिंग कंपनीत नुकतीच कामाला लागली होती. बुधवारी सकाळी कामाला जात असताना पिंपळे गुरव बसस्थानकाजवळ आली असता बसची दुचाकीला धडक लागली. यामुळे खाली पडल्याने ती बसच्या चाकाखाली आली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसचालकाला अटक केली. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1