Pimpri news: पिंपरी चिंचवड मधील 95 टक्के रुग्ण बरे

3.39 टक्के सक्रिय रुग्ण तर 1.40 टक्के मृत्यूदर 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाख असून त्यापैकी 87 हजार 433 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 3.49 टक्के आहे. बाधितांपैकी तब्बल 84 हजार 433 नागरिकांनी कोरोनाविरोधातील लढाई यशस्वीपणे जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.21 टक्के आहे. तर, आजमितीला 3308 सक्रिय रुग्ण असून त्याचे प्रमाण 3.39 टक्के आहे. आजपर्यंत 1526 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 1.40 टक्के आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मे पर्यंत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात कोरोनाने हाहा:कार उडविला होता. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत होती. मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले होते. बेडची उपलब्धतता खूप कमी होती. त्यामुळे नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पालिकेने बेडची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न केले. कोविड केअर सेंटर, खासगी रुग्णालयांमध्ये बेड वाढविले. आता बेडची कमतरता नाही.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून शहरातील रुग्णसंख्या घटली आहे. दिवसाला 250 ते 300 नवीन रुग्ण सापडत आहेत. त्याउलट बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. मृत्यूचे प्रमाण कमी आले आहे, हे आशादायक चित्र आहे.  सक्रिय रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण  चांगले आहे.  ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

शहराची लोकसंख्या 25 लाखाच्या आसपास आहे. 10 मार्चपासून आजपर्यंत शहरातील 87 हजार 433 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण केवळ 3.49 टक्के आहे. 87, 433 पैकी 84,125 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. त्याचे प्रमाण 95.21 टक्के आहे. पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये 911 तर खासगी रुग्णालये, होम आयसोलेट असे सध्या 3308 सक्रिय रुग्ण आहेत. त्याचे प्रमाण 3.39 टक्के आहे. तर, आजपर्यंत शहरातील 1526 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचे प्रमाण 1.40 टक्के आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'86b8d8255cd759c7',t:'MTcxMTY0MTc0Ny43NzcwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();