Nigdi : प्राधिकारणात 95 हजारांची घरफोडी

एमपीसा न्यूज – सेफ्टी दरवाजाची जाळी कापून चोरट्यांनी घरातील 95 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना प्राधिकरण येथे शुक्रवारी (दि. 6) उघडकीस आली.

चंद्रकांत मधुकर नेब (वय 48, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेअकरा ते शुक्रवारी पहाटे पावणेसहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी नेब यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरटयांनी घराच्या सेफ्टी दरवाजाची जाळी कापून आतील कडी कोयंडा उघडून घरात प्रवेश केला. घरातील डायनिंग टेबलच्या कप्प्यांमध्ये ठेवलेले 95 हजार 400 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.