Chikhali : फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- फ्लॅटचा वेळेवर ताबा न देता आणखी रकमेची मागणी करत एकाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुरुवारी (दि. 18) चिखली पोलीस ठाण्यात आकृती इस्टेट प्रा.ली.कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी जॅक सिल्वेस्टर मॅडीस (वय 48, रा.नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली असून किरण शिलेदार, नितीन ठक्कर, हितेश मजेतिया, उदय आचार्य, राहुल कंगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मॅडीस यांनी नेवाळे वस्ती चिखली येथील आरोपी यांच्या मेसर्स आकृती इस्टेट येथे फ्लॅट बुक केला. सर्व खर्चासह ४३ लाख रुपयांना फ्लॅटचा व्यवहार ठरला. तसेच डिसेंबर २०१६ मध्ये फ्लॅटचा ताबा देण्याचे ठरले. मात्र आरोपींनी वेळेत फ्लॅट न देता उर्वरित रक्कम देण्याची मागणी केली तसेच त्याबाबत नोटीस पाठवली. त्यानुसार आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी मॅडीस यांनी चिखली फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.