Chinchwad : गावी जाण्यासाठी पैसे न दिल्याने भावजय व पत्नीकडून पतीला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज- गावी जाण्यासाठी पैसे न दिल्याने भावजय व पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. गुरुवारी (दि. 18) पहाटे साडेचारच्या सुमारास चिंचवड विद्यानगर परिसरात ही घटना घडली.

या प्रकरणी नवनाथ सोपान तोरणे (वय ३४, रा.चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीता नवनाथ तोरणे (वय 26), अनिता संतोष तोरणे (वय 27, दोघी रा. चिंचवड) यांच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी पहाटे फिर्यादी यांची पत्नी नीता हिने त्यांना गावी जाण्यासाठी पैसे मागितले. फिर्यादी यांनी पैसे नसल्याचे सांगितले. या रागातून फिर्यादी यांच्या पत्नीने त्यांना फरशीने मारहाण केली. तर भावजय यांनी फिर्यादी याना हाताने मारहाण तसेच चावा घेऊन जखमी केले. पोलीस हवालदार दत्ता गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.