Maval : वारसा कामाचा हवा भ्रष्टाचाराचा नको – आमदार प्रशांत ठाकूर

एमपीसी न्यूज – खासदार श्रीरंग बारणे यांनी मागील पाच वर्षात मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत. केंद्र सरकारच्या अनेक योजना त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात राबवल्या आहेत. त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे केलेल्या कामाचा वारसा आहे. तर याउलट राष्ट्रवादी या पक्षाकडे त्यांनी केलेले आर्थिक घोटाळे आणि भ्रष्टाचार आहे. महायुतीच्या उमेदवाराकडे कामाचा वारसा आहे तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे भ्रष्टाचाराचा वारसा आहे. असे मत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले.

पनवेल खारघर शहरासह परिसरात महायुतीने झंझावाती प्रचार केला. अनेक ठिकाणी सभा बैठका घेतल्या. महायुतीच्या माध्यमातून मागील पाच वर्षात केलेली कामे जनतेसमोर मांडण्यात आली. त्यानंतर खारघर येथे वुमन्स वेल्फेअर असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौटमल, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, लीना गरड, अनिता पाटील, नगरसेवक परेश ठाकूर, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, रामदास शेवाळे, शंकर ठाकूर, समिश्रा देव, रुपेश पटेल, कॅप्टन चंद्रा वर्कर, डी बी पंडित, बलराम यादव, गजेश सिंग, सुंदरलाल, शिवप्रसाद थापीयाल आदी उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी खारघर मधील माउंट ब्लॅक सोसायटी येथे बंगाली समाज बांधवांशी चर्चा केली. त्यानंतर श्री जगन्नाथ मंदिर येथे दर्शन घेतले मंदिरात आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. संवाद साधत असताना त्यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामाचा आढावा घेतला. या चर्चेत शहरातील उडपी समाजबांधवांनी त्यांच्याशी वार्तालाप केला. सर्वांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. यापुढील काळात देखील विकास कामे अविरत सुरू राहणार आहेत. पनवेल शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम खासदार बारणे यापुढील काळात करतील. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करावे. तसेच विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता महायुतीला विजयी करावे, असे आवाहन देखील ठाकूर यांनी केले.

श्रीरंग बारणे म्हणाले, “शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी मी वेळोवेळी देशाच्या संसदेत विविध प्रश्न उपस्थित केले. केवळ प्रश्‍न उपस्थित केले नसून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. समस्यांचे समाधान शोधण्यावर भर दिला. केंद्र शासनाच्या अनेक योजना मावळ लोकसभा मतदारसंघात राबवल्या. महिला सक्षमीकरणात नरेंद्र मोदींनी आजवर सर्वाधिक काम केले आहे. प्रत्येकाला जगण्याचा समान अधिकार मिळावा यासाठी अधिक प्रभावीपणे या पुढील काळात विविध योजना राबवण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.