BNR-HDR-TOP-Mobile

Pune : कोथरूडमधील बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- कोथरूड मधील हॉटेल रॉयल लाउंज गार्डनमध्ये चालणाऱ्या बेकायदा हुक्का पार्लरवर छापा टाकून हुक्का पिणारे ग्राहक आणि हॉटेल मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (दि. 19) गुन्हे शाखा युनिट 4 ने केली.

या प्रकरणी हॉटेल मालक जुनेद असगरअली अन्सारी (वय 35 रा. दुराणी कॉम्प्लेक्स, मिठानगर, कोंढवा ) मॅनेजर तुषार प्रमोदकुमार सबलोक (वय 31 रा. पाषाण ), वेटर दिन मोहोम्मद शेख (वय 21) व अब्बास रिजहूल शेख (वय 31 मूळ दोघेही रा. नादिया. पश्चिम बंगाल ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्याचप्रमाणे सहा ग्राहकांवर सिगरेट व तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम सन 2003 चे कलम 4 अ 21 अ नुसार कारवाई करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट 4 ने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई शंकर संपते यांना कोथरूडमधील हॉटेल रॉयल लाउंज गार्डनमध्ये बेकायदा हुक्का पार्लर चालवले जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी शुक्रवारी छापा टाकला असता हॉटेलमध्ये सहा इसम हुक्का पीत असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे हॉटेलच्या काउंटरवर मद्याच्या बाटल्या ठेवण्यात आल्याचे दिसून आले. हॉटेलमालक अन्सारी यांच्याकडे मद्यविक्रीचा परवाना मागितला असता त्याच्याकडे अद्याप संबंधित परवाना नसल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी 23 हजार 935 रुपयांची बेकायदेशीर दारू आणि 21 हजार 600 रुपयांचे हुक्का साहित्य असे 45 हजार 535 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा ) प्रदीप देशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्यक पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, पोलीस हवालदार पवार, इंगळे, पोलीस शिपाई शंकर संपते यांनी केली

HB_POST_END_FTR-A4

.