BNR-HDR-TOP-Mobile

Chikhli : लाखो रुपये लुबाडणाऱ्या ब्लॅकमेलर तरुणीला सापळा रचून अटक 

चिखली पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज- फेसबुकवरून ओळख करून प्रेमाच्या जाळ्यात ओढत शारीरिक जवळीक निर्माण केली. त्याचे फोटो काढून लाखो रुपये लुबाडणाऱ्या ब्लॅकमेलर तरुणीला शनिवारी (दि.20) चिखली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून 78 हजारांचा ऐवज हस्तगत केला. चिखली पोलिसांनी ही कारवाई केली. तिने याप्रकारे अनेकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. 

सोनिया उद्देश मेहरा (वय 22, रा.कळस रोड, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी एक 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

सोनिया व फिर्यादी यांच्या पतीची फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर माझी परिस्थिती बेताची आहे व नोकरीच्या शोधत असल्याचे सांगत सहानभूती मिळवली. त्यांच्यात अनेकदा पैश्याचे व्यवहार झाले. तिने पैसे परत देऊन विश्वास संपादन केला. दरम्यान तिने एके दिवशी पीडित तरुणाला भेटण्याच्या बहाण्याने हॉटेलवर बोलवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, त्याचे नकळत फोटो घेतले.

त्यांनतर त्या फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मोबाईल, गाडी, सोन्याची चैन, व रोख रक्कम अशी मागणी करत चार लाख रुपये उकळले. हा प्रकार वाढत चालल्याने सोमनाथ यांनी पत्नीला सर्व प्रकार सांगितला. त्यांनतर दोघांनी चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांच्या सांगण्यावरून चिखली येथे आरोपीला रक्कम घेण्यास बोलावले. चिखली पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचून आरोपी तरुणीला 10 हजार रुपये घेताना रंगेहाथ अटक केली.

तिने याप्रकारे आणखी किती जणांची फसवणूक केली आहे याबाबत उपनिरीक्षक रत्ना सावंत अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3