Maval : तुम्ही आमचे मालक नाहीत, आम्ही तुमचे मालक आहोत हे त्यांना दाखवून देण्याची वेळ – प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज – लोकांनी यांना सत्ता दिली, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मात्र त्यांना आता मग्रूरी आली आहे. त्यामुळे तुम्ही आमचे मालक नाहीत आम्ही तुमचे मालक आहोत हे मावळातील जनतेने त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रुमख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मावळच्या जनतेने दाखवून द्यावे की आपण अजित पवार यांचे गुलाम नाहीत, असेही ते म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या देहूरोड येथील प्रचारसभेत ते बोलत होते. सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मावळमध्ये चॉकलेट पर्व सुरु असून चॉकलेट कोणाला दिले त्याचे चारित्र्य काय? असा सवाल करत आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “निवडणूक नातवांचे लाड पुरवण्यासाठी झाल्या असून सगळीकडे थट्टा मस्करीच सुरू आहे. एका नेत्याने माढा मधून माघार घेऊन नातवाला मावळमधून उमेदवारी दिली. त्या नातवाचे गुण सांगितले तर आजाेबांना धक्का बसेल” असेही आंबेडकर म्हणाले.

“इंदू मिल येथील स्मारकाच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात माेदी मला म्हणाले, ‘तुम्ही मला भेटत नाहीत’. तेव्हा मी त्यांना म्हणालो, कामाशिवाय मी काेणाला भेटत नाही. परंतु, मला माेदींना सांगायच की मी त्यांना आता 23 मे नंतरच भेटणार आहे” असे आंबेडकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like