Bhosari : गोणीत लपवलेला 27 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज- गस्तीदरम्यान भोसरी पोलिसांनी संशयितांकडून गोणीत लपवलेला 27 किलो गांजा जप्त केला. रविवारी (दि.21) पहाटे अडीचच्या सुमारास भोसरी गावजत्रा मैदानाजवळील भाजी मंडईत ही कारवाई करण्यात आली.

मतीन मेहबूब शेख (वय 26, रा. बालीक आश्रम रस्ता, लेंडकर मळा, अहमदनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

शेख हा रविवारी पहाटे भोसरी गावजत्रा मैदानात संशयास्पदरित्या थांबला होता. गस्तीवर असणारे भोसरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बि.एन.काबुगडे यांनी त्याला पहिले. त्याला संशयावरून ताब्यात घेऊन गोणी तपासली असता त्यामध्ये 27 किलो 110 ग्रॅम वजनाचा 4 लाख 6 हजार रुपये किमतीचा गांजा मिळाला. भोसरी पोलिसांनी त्याला अटक केली असून हा गंगा कोठून आला होता तसेच कोणाला विकणार होता याबाबत तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.