Alandi : अज्ञात टवाळखोरांनी बस स्थानकावर उभी असणारी एसटी बस पेटवली

एमपीसी न्यूज- अज्ञात टवाळखोरांनी बस स्थानकावर उभी असणारी एसटी बस पेटवून 15 लाखांचे नुकसान केल्याची घटना आळंदी बस स्थानकावर घडली. या प्रकरणी सोमवारी (दि.22) दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बस डेपो व्यवस्थापक अनिल भिसे यांनी फिर्याद दिली असून अज्ञात टवाळखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड विभागाची कंधार डेपोची एसटी बस (एमएच 20 बीएल 3719) ही 17 एप्रिलला रात्री आळंदी बस स्थानकावर उभी करण्यात आली होती. 18 एप्रिल रोजी पहाटे अडीचच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी बसला पाठीमागून आग लावली. यामुळे बसने पेट घेतला. नागरिक व अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली. यामध्ये 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.