Chinchwad : पार्थ पवार यांना स्पॅको कंपनीच्या कामगारांचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – कामगार विरोधी सरकार घालवण्यासाठी, कामगारांच्या हिताचे धोरण ठरविण्यासाठी शहरातील रोजगार वाढीसाठी कारखान्यांना पोषक वातावरण निर्माण करणारे सरकार निवडून आणण्यासाठी पार्थ अजित पवार यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन आज शेतकरी कामगार पक्षाचे शहराध्यक्ष नितीन बनसोडे यांनी स्पॅको कंपनी चिंचवड एमआयडीसी येथे कामगारांना केले.

महिला शहराध्यक्ष छायावती देसले, उपाध्यक्ष भाई भालचंद्र (नाना) फुगे, कोषाध्यक्ष भाई राजेंद्र देवकर, संघटक भाई सुभाष साळुंके, भाई राहुल पडवळ, पिंपरी विधानसभा अध्यक्ष भाई परमेश्वर माने, भाई सुनील लाड, सारिका फुगे, सिता जगताप, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.