Pune/ Baramati….. अशी आहे संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी

पुण्यात सरासरी 43.95 टक्के तर बारामतीमध्ये 55.20 टक्के मतदान

एमपीसी न्यूज- देशभरात यंदा सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होत आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 14 जागांसह देशातील 115 जागांवर आज मतदान होत आहे. पुण्यात महायुतीकडून पालकमंत्री गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी तर बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल या लढतींकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. पुण्यात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 43.95 टक्के तर बारामतीमध्ये 55.20 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.  संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

बारामती लोकसभा मतदारसंघ

दौंड 52.01 %
इंदापूर 56.89 %
बारामती 62.80 %
पुरंदर 52.70 %
भोर 56.74 %
खडकवासला 48.89 %

पुणे लोकसभा मतदार संघ

वडगावशेरी 44.32 %
शिवाजीनगर 41.20 %
कोथरूड 44.95 %
पर्वती 47.00 %
पुणे कॅन्टोन्मेंट 41.67 %
कसबा 43.44 %

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.