Pune : झिंबाब्वेतील वादळग्रस्तांना पुणेकर रोटेरियनची चार वॉटर फिल्टरची मदत

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 आणि 'युनायटेड नेशन झिंबाब्वे ग्रुप' चा पुढाकार

एमपीसी न्यूज- झिंबाब्वेमध्ये मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या इडाई या वादळ- पाऊस-पुर संकटात बेघर झालेल्या नागरिकांना पुणेकर रोटेरियन राहुल पाठक यांनी 4 वॉटर फिल्टरची मदत केली आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 आणि ‘युनायटेड नेशन झिंबाबे ग्रुप’ यांनी याकामी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पाठक यांनी ही मदत केली आहे.

झिंबाब्वेमध्ये मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या इडाई या वादळ- पाऊस-पुर संकटात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले. हजारो लोक बेघर झाले. 2 लाख लोकांना या वादळाचा फटका बसला .पिके आणि जनावरे पण नष्ट झाली.

‘युनायटेड नेशन झिंबाबे ग्रुप’ या नावाने भारतातील व इतर देशांतील हितचिंतकांचा एक समूह कार्यरत असतो. त्या ग्रुपमधे पुण्यातून रईसा शेख, सतीश खाडे हे सदस्य कार्यरत आहेत. सतीश खाडे यांनी रोटरी परिवारात आवाहन केल्याबरोबर रोटरी क्लब कोथरूडचे राहुल पाठक यांनी त्यांच्या ‘एक्वा प्लस ‘( Aqua plus) या कंपनी मार्फत ताबडतोब 4 मोठे वॉटर फिल्टर झिंबाबे येथे मदत म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला. सर्व प्रकारच्या औपचारिकता पार पाडीत 4 वॉटर फिल्टर घेऊन स्वतः रोटेरियन राहुल पाठक आपल्या सहकाऱ्यांसोबत झिंबाबेत दाखल झाले आणि 4 मोठे वॉटर फिल्टर बसविले .

‘एक्वा प्लस ‘(Aqua plus) ही कंपनी पुण्यातील असून पूर, वादळ, भूकंप अशा आपत्कालीन संकटाच्या वेळी शुद्ध आणि संरक्षित पाणी देण्यासाठी वॉटर फिल्टर सारखे विविध उपकरणे बनवते. अशा उपकरणामध्ये वीज किंवा इतर उर्जा लागत नाही. सहज व जलद उभारु शकणारे हे फिल्टर्स अॅक्वा प्लस कंपनीने बनवले आहेत.

हजारो लोकांना आता वादळ व पुरानंतर येणाऱ्या रोगराई वेळी दूषित पाणी मिळण्याऐवजी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. पुण्यातील रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 सर्वात प्रथम तिथे राहुल पाठकांच्या रूपात धावून गेले आहे. हे घडवून आणण्यात रोटेरियन सतीश खाडे व रईसा शेख यांचा सहभाग महत्वाचा ठरला.  राहुल पाठक व त्यांच्या कंपनीने यापूर्वी गेल्या पावसाळ्यात केरळमध्ये आलेल्या पुराच्या वेळी सुद्धा तीनच दिवसात अनेक वॉटर फिल्टर्स उभारून हजारो लोकांना साथीच्या रोगापासून वाचवले होते.

‘रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चा पाणी विषयक उपक्रम फक्त पुणे जिल्हा व महाराष्ट्राच्या पलीकडे पोहचला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे ‘असे रोटरीचे प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर यांनी म्हटले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.