BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : पोलीस नाईक दत्तात्रय बनसोडे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दत्तात्रय मारुती बनसोडे यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. 
त्यांच्या निवडीबद्दल पुणे जिल्ह्यात व मावळ तालुक्यात त्यांचे विशेष कौतुक होत आहे. 

बनसोडे हे सन 2002 साली पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या सेवेत रुजु झाले. बनसोडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे, क्राइम युनिट 2, पिंपरी चिचंवड पोलीस आयुक्तालय येथे विशेष कामगिरी केली आहे. नोकरी करीत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. 2016 साली खात्यांतर्गत महाराष्ट राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. सोमवारी (दि 22) रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्रात 166 व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली.

HB_POST_END_FTR-A4

.