BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पादचारी महिलेचे मंगळसूत्र लंपास

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलेचे 40 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरटयांनी लंपास केले. मंगळवारी (दि.23) रात्री साडेअकराच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथे ही घटना घडली.

या प्रकरणी कविता जितेंद्र सांडभोर (44, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन चोरटयांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कविता रात्री जेवण झाल्यानंतर त्यांच्या सासूसोबत शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. दरम्यान, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील 20 ते 22 ग्रॅम वजनाचे 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

सांगवीत महिलेचे मंगळसूत्र लंपास

दुचाकीस्वार चोरटयांनी पादचारी महिलेचे 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. बुधवारी (दि. 24) रात्री नऊच्या पिंपळे गुरव येथे ही घटना घडली.

या प्रकरणी मंदाकिनी अशोक भालकर (वय 47, रा. पिंपळेगुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी भालकर या बुधवारी रात्री नऊच्या सुमारास रस्त्याने पायी जात होत्या. पिंपळे गुरव येथे आल्या असता पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.